जागतिक सहिष्णुता सप्ताहास हरिनाम गजरात प्रारंभ 

0
आळंदी : विश्‍वशांती केंद्र, माईर्स एमआयटी व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्यावतीने जागतिक सहिष्णुता सप्ताहास हरिनाम गजरात प्रारंभ झाला. श्रीसंत ज्ञानेश्‍वर तुकाराम ज्ञानतीर्थ विश्‍वरूप दर्शन मंचावर संत तत्त्वज्ञ श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या 723 व्या संजीवन समाधी दिन सोहळ्या निमित्त लोकप्रबोधनपर जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी उर्मिला विश्‍वनाथ कराड, बाळासाहेब रावडे,एमआयटी आर्ट, डिझाईन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश कराड, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका प्रा.स्वाती कराड-चाटे, मानकरी गणपत कुर्हाडे, ह.भ.प.विष्णु महाराज केंद्रे, ह.भ.प.डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर, एमआयटी अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य प्रा.डॉ.वाय.जे.भालेराव आदी उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब रावडे म्हणाले, माऊलींच्या समाधी मुळे आळंदीला महत्त्व प्राप्त झाले आहे. अलंकापुरी हे जगातील एक मोठे वैभव आहे. विश्‍वनाथ कराड यांनी आळंदीत विकास कामे करून नदी परिसरात घाटांचे कामाने वैभव वाढले आहे.
Copy