जागतिक दिव्यांग दिनानिमित्त गुणवंत कर्मचाऱ्याचा सत्कार

 

 


नंदुरबार – जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज महाराष्ट्र राज्य अंपग कर्मचारी संघटनेच्या नंदुरबार शाखेतर्फे कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयातील उत्कृष्ट काम करणारे चंद्रशेखर पाटील, राजेंद्र बोरसे, रतिलाल निकम, बालकिसन ठोंबरे, दिलीप पटले, संगीता कोकणी, ज्योती पाटील, कैलास वसावे, श्रीकांत वसईकर, किशोर बोरसे, अर्जुन चौरे आदी दिव्यांग कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार  करण्यात आला.

 

 

कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भास्कर कुवर, नंदुरबार जिल्हाध्यक्ष आसिफ शेख, सचिव आनंदराव करनकाळ, उपाध्यक्ष मनोहर पाटील, कोशाध्यक्ष जुबेर तांबोळी, तालुका अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, सचिव राजेंद्र बोरसे आदी उपस्थित होते. कुुुवर यांनी मनोगत व्यक्त केले.  तांबोळी व करनकाळ यांनी सूत्रसंचालन केले.