जागतिक क्रमवारीत सिंधू 5 व्या स्थानावर

0

नवी दिल्ली। ऑलिंपिकमध्ये रजत पदक विजेती पी. व्ही. सिंधू बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत 5 व्या स्थानावर पोहचली आहे. बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या 5 मध्ये स्थान मिळवणारी आतापर्यंतची ती दुसरी भारतीय महिला ठरली आहे. सिंधूने या महिन्यात सय्यद मोदी ग्रँड प्रिक्स जिंकली आहे. सध्या तीचे जागतिक गुण 69,399 इतके आहेत. भारताचीच साईना नेहवाल जागतिक क्रमवारीत सध्या 9 व्या क्रमांकावर आहे.

वर्षाच्या अखेरीस पहिल्या 3 मध्ये येणार
ऑलिंपिकमधील रजत पदक, चीन ओपनमध्ये विजेतेपद, हाँगकाँग सुपर सिरिजमध्ये अंतिम फेरीत प्रवेश असे विजय तीने नोंदवले आहेत. बॅडमिंटनमधील पुरुषांच्या जागतिक क्रमवारीत अजय जयराम 18 व्या क्रमांकावर, के. श्रीकांत आणि एच. एस. प्रनोय 21 आणि 23 व्या क्रमांकावर आहेत. पुरूष दुहेरीमध्ये मनु अत्री आणि सुमीथ रेड्डी 24 व्या क्रमांकावर तर सिक्की रेड्डी आणि प्रणव चोप्रा 14 व्या क्रमांकावर आहेत. या यशाबद्दल सिंधूने आनंद व्यक्त केला आहे. ‘या वर्षाच्या अखेरीस पहिल्या 3 क्रमांकात स्थान मिळवण्याचे उद्देश आहे,’ असे ती म्हणाली.