जसलीन मथारू होती गर्भवती; गर्भपात केल्याचा धक्कादायक खुलासा

0

नवी दिल्ली-यंदाच्या ‘बिग बॉस 12’च्या घरातील सर्वाधिक चर्चा आहे ती एका जोडीची. भजनसम्राट अनूप जलोटा आणि त्यांची गर्लफ्रेन्ड जसलीन मथारू यांच्या संबंधाबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. ६५ वर्षांचे अनूप जलोटा ३७ वर्षांनी लहान जसलीनसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. खुद्द अनूप आणि जसलीन यांनी ‘बिग बॉस12’च्या घरात प्रवेश करताना नॅशनल टीव्हीवर आपले रिलेशनशिप मान्य केले. सर्वांनाच या गोष्टीचा चांगलाच धक्का बसला आहे. आता अनुप आणि त्यांची गलफ्रेंड जसलीन यांच्या नात्याविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जसलीन गेल्या वर्षी गरोदर होती. यावरून तिच्यात आणि अनुप यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले होते. तिने त्यानंतर गर्भपात केला असल्याचे मला काही दिवसांनंतर कळले होते. जसलीन अनूप यांना फसवत असल्याची भीती देखील नेहमीच त्यांच्या मनात आहे. तिचा लंडनमध्ये प्रियकर असल्याचा त्यांना संशय आहे. पण असे काहीही नसल्याचे जसलीनने अनेकवेळा त्यांना सांगितले आहे.

अनिशा सिंह शर्मा या अभिनेत्रीने अनेक खुलासे केले आहेत. अनिशाने अनुप जलोटा यांनी मला मालिकेत चांगली भूमिका देण्यासाठी माझ्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली होती. मला बिग बॉस मध्ये घेऊन जाणार असे देखील त्यांनी मला सांगितले होते. एवढेच नव्हे तर जसलीन आणि त्यांच्यातील सगळ्या गोष्टी ते मला सांगतात.