जसलीं माथारू आणि अनुप जलोटा यांचं बिग बॉसमध्ये ब्रेकअप

0

मुंबई : वादग्रस्त शो बिग बॉस मध्ये या वर्षी एक अनोखी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. ती म्हणजे २७ वर्षीय जसलीं माथारू आणि ६५ वर्षीय अनुप जलोटा यांची. मात्र, यांची ही जोडी आता तुटण्याच्या मार्गवर आहे. गेली दोन दिवस ती जलोटा यांना संबंध न तोडण्याची विनंती करीत आहे. मात्र आपल्या निर्णयावर जलोटा ठाम आहेत. मात्र ही प्रेमकहाणी अधूरीच राहणार का ? हा खरा प्रश्न अनुत्तरीत आहे.

याचे कारण म्हणजे जसलीनच्या एका गोष्टीने अनुप हे खूप दुःखी झाले आहे. यामुळे त्यांनी आपले तीन वर्षांचे रिलेशनशिप संपवली आहे.जसलीनने कधी विचारही केला नसेल, की एका गोष्टीमुळे अनुप एका क्षणातच नातं तोडून टाकतील. झाले असे की १ ऑक्टोबरला दाखविलेल्या एपिसोडमध्ये जसलीनला नॉमिनेशन टास्कमध्ये स्वतःला आणि अनुप जलोटा यांना वाचवायचे होते. त्यासाठी तिला आपले कपडे फाडून, मेकअप आणि केस खांद्यापर्यंत कापायचे होते. हे करण्यास तिने नकार दिल्यामुळे अनुप आणि जसलीन टास्क करण्यात अपयशी झाले. जसलीन माझ्यासाठी एवढेही करु शकत नाही. मी तिच्या जागी असलो असतो, तर असं कधीच केले नसते. मी माझ्या सर्व वस्तु पुढे आणून ठेवल्या असत्या, अशी भूमिका अनुप जलोटा यांनी घेतली असून अद्यापही त्यावर ते ठाम राहिल आहेत. जसलीन आणि जलोटा यांचे नाते पुन्हा पूर्ववत होईल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.