जवानांसमोरही कोरोनाचे संकट; २४ तासात ३६ बीएसएफच्या जवानांना कोरोनाची लागण

0

नवी दिल्ली: जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातील रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या साडेसहा लाखांच्या पुढे गेली आहे. सीमेवर देशासाठी लढणाऱ्या जवानांसमोर कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. मागील २४ तासात ३६ बीएसएफ जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३३ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ८१७ जवान बरे झालेले आहेत. सध्या ५२६ जवानांवर उपचार सुरु आहे.

Copy