जळगाव शहर राष्ट्रवादीची धुरा युवा नेतृत्वाकडे

0

राष्ट्रवादीच्या जळगाव शहर जिल्हाध्यक्षपदी अभिषेक पाटील

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव शहर जिल्हाध्यक्षपदी युवकचे शहराध्यक्ष अभिषेक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर राष्ट्रवादीच्या दृष्टीने अभिषेक पाटील यांची नियुक्ती महत्वाची मानली जात आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्येक राजकीय पक्षांकडुन संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये खांदेपालट देखिल केली जात आहे. जळगाव शहरात देखिल आगामी काळात होणार्‍या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन खांदेपालट करण्यात आली आहे. जळगाव शहर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी अभिषेक पाटील यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या हस्ते अभिषेक पाटील यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. अभिषेक पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाचे आ. राजूमामा भोळे यांच्याविरूध्द निवडणूक लढवुन तब्बल ४४ हजाराहुन अधिक मतदान मिळविले होत. युवा नेतृत्व म्हणून अभिषेक पाटील यांच्या या नियुक्तीबद्दल जिल्हा नेत्यांकडुन त्यांचे स्वागत होत आहे.

Copy