Private Advt

जळगाव शहरात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला बालदिन

 

जळगाव – लहान मुलांसाठी बाल दिन हा विशेष दिवस 14 नोव्हेंबरला भारतात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा ‘जागतिक बाल दिन’ अनेक देशांत साजरा होतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म तारखेला (14 नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो.रविवारी जळगाव शहरात विविध ठिकाणी बालदिन साजरा करण्यात आला

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बाल दिन उत्साहात साजरा

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रविवार, १४ नोव्हेंबर रोजी सकाळी बालक दिन साजरा करण्यात आला. यावेळी बालरोग व चिकित्सा विभागात दाखल बालकांकडून केक कापण्यात आला. तसेच बालकांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी वॉर्डातील सर्व बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.

बालरोग व चिकित्सा विभागातील डॉ. गिरीश राणे, डॉ. अतुल गाजरे, डॉ. शिवहर जनकवडे, डॉ. स्नेहल पल्लोड, डॉ. निलांजना गोयल, डॉ. विश्वा भक्ता आदी उपस्थित होते. मुख्य अधिसेविका प्रणीता गायकवाड यांच्या मार्गदर्शनखाली विभाग इन्चार्ज सिस्टर्स संगीता शिंदे, परिचारिका आढळे, स्टाफ नर्स जयश्री पाटील, दीपमाला भैसे, सविता सामुद्रे, तुळसा माळी, नीलम पाटील, कल्पना मांजरेकर, कक्षसेवक, एसएमएस कर्मचारी आदींनी सहकार्य केले. प्रसंगी पालकांच्या नातेवाईकांनी डॉक्टर, परिचारिका यांचे आभार मानले.

 

 

नेहरू जयंती साजरी

जळगाव – खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित , कै.गि.न.चांदसरकर प्राथमिक विद्यामंदिर येथे शाळेत पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती रविवारी साजरी करण्यात आली . कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम भारताचे पहीले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या फोटोचे प्रतिमेचे पुजन व हारपुप्ष घालुन जयंती साजरी करण्यात आली.तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्याम ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या विषयी व बालदिनाची आॅनलाईन माहीती सांगीतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्याम ठाकरे , जयश्री पाटील , स्वप्निल भोकरे , महेश तायडे, भूषण अमृतकर या सर्वांनी परिश्रम घेतले.

प वि पाटील विद्यालयात बालदिन उत्साहात साजरा

जळगाव – मुले ही देवाघरची फुले असे मानणारे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान तसेच मुलांचे आवडते चाचा – पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प.वि. पाटील विद्यालय जळगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सरला पाटील यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कालियामर्दन भक्त प्रल्हाद बाळ श्रावण बाळ आजीबाईच्या गोष्टी कृष्ण सुदामा आदी पौराणिक बालकथा ऑनलाइन सेशनच्या माध्यमातून सांगितल्या.
उपशिक्षक योगेश भालेराव यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याची माहिती दिली तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले प्रसंगी मुख्याध्यापिका रेखा पाटील ,उपशिक्षक अशोक चौधरी , कल्पना तायडे , धनश्री फालक, सूर्यकांत पाटील , दिपाली चौधरी , स्वाती पाटील , सुनील नारखेडे , सुधीर वाणी आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ए.टी.झांबरे शाळेत बालदिन साजरा

जळगाव -ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला . त्यानंतर पंडीत नेहरू यांच्या जीवनावर स्वरचित कविता दामोदर चौधरी या विद्यार्थ्याने सादर केली. तसेच ए.एन पाटील, सी.बी. कोळी, माधुरी भंगाळे यांनी नेहरू यांच्या जीवनावर आधारित प्रसंग कथन केले. कार्यक्रमाला सतिश भोळे, डी.ए.पाटील, प्रतिभा लोहार , इ .पी.पाचपांडे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर बंधू भगिनीं उपस्थित होते.