जळगाव शहरात कोरोना चार हजार पार

0

जळगाव । जिल्ह्यात कोरोनाने सलग चौथ्या दिवशी पाचशेचा आकडा पार केला आहे. गुरुवारी जिल्ह्यात नव्याने 574 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहे. एकूण रुग्णसंख्या 16 हजार 536 झाली आहे. सर्वाधिक रुग्ण 168 हे जळगाव शहरात आढळून आले असून जळगावातही कोरोनाने चार हजारांचा टप्पा पार केला आहे. तर दिवसभरात 11 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असून दुसरीकडे 344 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्हयात दिवसेंदिवस कोरोना प्रादुर्भाव वाढतच आहे. गुरुवारी नव्याने 574 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 168, जळगाव ग्रामीण 26, भुसावळ 22, अमळनेर 89, चोपडा 64, पाचोरा 25, भडगाव 9, धरणगाव 32, यावल 23, एरंडोल 4, जामनेर 31, रावेर 14, पारोळा 39, चाळीसगाव 21, मुक्ताईनगर 3, बोदवड 1 व इतर जिल्ह्यातील 4 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 11 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर आणि भडगाव , यावल तालुक्यातील प्रत्येक 2 तर चोपडा, रावेर, एरंडोल, जळगाव , जामनेर तालुक्यातील प्रत्येकी एका बाधीताचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Copy