जळगाव शहरात कोरोनाने हजाराचा टप्पा ओलांडला

0

जळगाव– जिल्ह्यात तब्बल 156 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 4 हजार 586 झाली आहे. रविवारी सर्वाधिक कोरोनाबाधीत 56 रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहे. दिवसभरात 11 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

आज नव्याने 156 रूग्णांची त्यात भर पडली आहे. यात जळगाव शहर 56, जळगाव ग्रामीण 18, भुसावळ 12, अमळनेर 7, चोपडा 8, पाचोरा 4, भडगाव 3, धरणगाव 7, यावल 3, एरंडोल 1, जामनेर 13, रावेर 12, मुक्ताईनगर 10 , बोदवड 1 व अन्य जिल्ह्यातील 1 याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे दिवसभरात 11 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरातील 1, चाळीसगाव, एरंडोल व यावल तालुक्यातील प्रत्येकी 2, पारोळा, भुसावळ, भडगाव, रावेर या तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात नवीन 156 बाधीत रुग्णांची भर

Copy