Private Advt

जळगाव शहरात आज आणखी ३ कोरोना बाधित रूग्ण; एकूण रुग्ण १८३

0

जळगाव :जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या 158 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 155 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर तीन व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या तीनही व्यक्ती जळगाव शहरातील आहे. यामध्ये मेहरूण येथील 33 वर्षीय महिला व 1 वर्षीय मुलीचा तर श्रीधर नगर येथील 60 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

काल रात्री व आज जिल्ह्यातील सहा व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 183 इतकी झाली असून त्यापैकी पंचवीस रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकोणतीस रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.