जळगाव शहरात अजून ३ कोरोना पॉजिटीव्ह

0

जळगाव – जळगाव, यावल, भुसावळ, जामनेर, अमळनेर, रावेर, एरंडोल येथील स्वॅब घेतलेल्या 180 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे.

पैकी 177 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर तीन व्यक्तींचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती या जळगावातील सुप्रीम काॅलनी, शिवाजी नगर, संभाजी चौक येथील आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 445 इतकी झाली आहे. जिल्ह्यातील 195 रूग्ण कोरोनावर मात करून बरे होऊन घरी गेले आहे तर 50 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Copy