जळगाव शहरातील सर्व सेवा एका क्लिकवर

0

जळगाव-(प्रतिनिधी) – सध्याच्या ऑनलाईन जगात खरेदी-विक्रीसाठी अनेक अँप उपलब्ध आहेत परंतु त्यात जळगावच्या प्रत्येक व्यावसायिकाला सामावून घेणारे हक्काचं एकही नाही. आपल्या जळगावकरांसाठी हक्काचं असलेले ‘सिटी मंत्रा’अँप अजिंक्य तोतला यांनी उपलब्ध करून दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदी काळात या अँपचा शहरवासियांना मोठा फायदा होत आहे. 

जळगाव शहरातील अजिंक्य संजय तोतला या उच्चशिक्षित तरुणाला आपण समाजाचं देणं लागतो या उदात्त भावनेने ग्रासले. नियमीत सेवा करणे, एखादी वस्तू भेट, दान देणं, लहानशी वास्तू उभारणे हे सर्वच करतात परंतु काहीतरी नवीन आणि बदलत्या जगाला अनुसरून करण्याचा विचार अजिंक्यने केला होता.

अशी सुचली ‘सिटी मंत्रा’ची कल्पना

अजिंक्य तोतला यांनी नाशिक येथून कॉम्प्युटर इंजिनियरिंग केले त्यानंतर मुंबई येथून एमबीएची पदवी घेऊन ते आपल्या गावी जळगावला आले. मोठमोठ्या शहरात नवनवीन कल्पना वापरून विविध अँपद्वारे ऑनलाइन सेवा दिली जाते. परंतु त्याचा जळगावात फारसा प्रभाव नाही. जळगावातील नागरिकांना एकाच अँपद्वारे सर्व सुविधा मिळाव्या या दृष्टीने त्यांनी ‘सिटी मंत्रा’ संकल्पनेची सुरुवात २०१७ मध्ये व्हाट्सएपच्या माध्यमातून केली.

जळगावच्या व्यावसायिकांना मिळाली हक्काची बाजारपेठ

२०१७ च्या सुरुवातीला ‘सिटी मंत्रा’ व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून केक, बेकरी, हॉटेल, फुल भांडार व्यावसायिक जुळले. ग्रुपवर येत असलेल्या ऑर्डर प्रत्येक ग्राहकांपर्यंत वेळेत पोहोचवल्या जाऊ लागल्या. ‘सिटी मंत्रा’शी जुळणाऱ्या आणि ज्यांना आपला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी तज्ज्ञांची मार्गदर्शन कार्यशाळा अजिंक्य तोतला आयोजित करू लागले. मेट्रो शहरातील अत्याधुनिक पद्धत जळगावात पहिल्यांदाच मोफत प्रयोगात आणण्यात आली. जळगावातील लहान-मोठ्या व्यावसायिकांना आपल्या हक्काची ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध झाली.

दुरुस्ती, खरेदीसह सर्व सेवा एकाच अँपवर उपलब्ध

सिटी मंत्राच्या ऑनलाईन चळवळीला मिळत असलेला प्रतिसाद पाहून अजिंक्य तोतला यांनी अँड्रॉईड आणि आयओएस प्रणालीवर आधारित असलेले अँप ऑक्टोबर २०१९ मध्ये लॉन्च केले. अँपवर अनेक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यात स्पा थेरपी नोंदणी, दुचाकी दुरुस्ती, प्लंबर, सुतार, इलेक्ट्रिशियन, आरओ दुरुस्ती अशा अनेक सेवा उपलब्ध आहे. इतकंच नव्हे तर किराणा माल, फळे, सुका मेवा, मसाले देखील उपलब्ध आहेत.

बातम्या, रक्तसाठ्याची अद्ययावत माहिती

वस्तू, सेवा विक्री सोबतच अँपवर जळगाव जिल्ह्यातील बातम्या, शहरातील रक्तपेढ्यांची माहिती देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. रक्तपेढीत असलेला दररोजचा रक्तसाठा अँपवर दिसण्याची सोय देखील लवकरच करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केले बदल

देशात कोरोनाची साथ सुरू असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजिंक्य तोतला यांनी देखील सिटी मंत्रा अँपमध्ये बदल केले. जीवनावश्यक वस्तू, सेवांची यादी अपडेट करण्यात आली असून इतर सेवा वगळण्यात आल्या आहेत. तसेच शहरात दररोज राबविण्यात येत असलेले सामाजिक कार्य, प्रधानमंत्री सहाय्यता निधी, मुख्यमंत्री सहाय्यता निधीची माहिती देखील अँपवर देण्यात आली आहे. कोरोनापासून बचाव कसा करावा, नागरिकांनी काय काळजी घ्यावी हे देखील अँपमध्ये देण्यात आले आहे.

जळगावकरांनी एकवेळ अवश्य भेट द्यावे असे अँप ‘सिटी मंत्रा’

जळगाव शहरवासियांना अर्पित केलेले हक्काचं अँप सिटी मंत्रा आहे. आपण गुगल अँप स्टोर किंवा अँपल स्टोरवर जाऊन City Mantraa टाईप करून अँप डाउनलोड करू शकता. आम्ही उपलब्ध करून दिलेल्या सेवा सुविधांचा लाभ आपण एका क्लीकवर मिळवू शकता. प्रत्येक जळगावकरांनी आपल्याच शहरवासियांच्या उन्नतीसाठी आणि वेळेच्या बचतीसाठी सिटी मंत्रा अँपचा लाभ घ्यावा.

अजिंक्य तोतला
Copy