Private Advt

जळगाव शहरातील व्यापार्‍याची आत्महत्या

जळगाव : शहरातील आदर्श नगरातील रहिवाशी असलेल्या व्यापार्‍याने घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवार, 8 जानेवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. विष्णू सच्चानंद आहुजा (38) असे आत्महत्या केलेल्या व्यापार्‍याचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पंख्याला गळफास घेत आत्म्हत्या
आदर्शनगरातील समाधान गोल्ड सीटी या गृहसंकुलातील चौथ्या मजल्यावर वास्तव्यास असलेल्या विष्णू सच्चानंद आहुजा (38) हे शनिवारी सकाळी बराच वेळ झाला खाली न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला परंतु ते दरवाजा उघडत नव्हते. कुटुंबियांनी काही वेळाने दरवाजा तोडून उघडला तेव्हा त्यांनी छताच्या पंख्याला गळफास घेतलेला आढळून आला. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.

एमआयडीसी पोलिसात नोंद
जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विष्णू आहुजा यांचे बळीराम पेठेत रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परीवार आहे. विष्णू आहुजा यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.