जळगाव शहरातील पोलीस कर्मचारी कोरोनाबाधीत

0

जळगाव : कोव्हीड रुग्णालयात सोमवारी अहवाल प्राप्त झाले. यात शहरातील एक पोलिस कर्मचारी कोरोनाबाधीत असल्याचे समोर आले आहे.

दक्षता नगर पोलीस लाईनमध्ये वास्तव्याला असलेला तथा पोलीस अधीक्षक कार्यालयातील एका विभागात काम करणार्‍या पोलीस कर्मचार्‍याला कोरोनाचे लक्षण जाणवल्याने त्याला कोवीड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा अहवाल सोमवारी सायंकाळी प्राप्त झाला असुन तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळुन आले आहे. दरम्यान, संबंधित कर्मचार्‍याच्या कुटुंबासह इमारतीतील इतर कुटुंबालाही तपासणीसाठी कोवीड रुग्णालयात नेण्यात आले असुन क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

Copy