जळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त

0

जळगाव: शहराच्या विकासासाठी विविध योजनेंतर्गत 10 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर झाला असून त्या अंतर्गत शहरातील विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. विकासकामांमध्ये शक्यतो रस्त्यांच्या डांबरीकरणाला प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिली.

जळगाव शहराच्या विकासासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री आ.गिरीष महाजन, आ.सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याने नगरोत्थान योजनेअंतर्गत 5 कोटी, दलितेतर योजनेअंतर्गत 5 कोटी आणि अग्निशमन सेवा बळकटीकरण करण्यासाठी 50 लाख असा एकूण 10 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर निधीपैकी 1 कोटींची कामे आ.सुरेश भोळे सुचवतील ते आणि 1 कोटींची कामे महापौर सुचवतील ती करण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक प्रभागासाठी 40 लाखांच्या निधीचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली आहे. सर्व कामे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न असून त्यात शक्यतो रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे केली जाणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.

Copy