जळगाव वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचविल्याचा आरोप

विधानसभेत प्रचंड गदारोळ; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

जळगाव / मुंबई : जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील काही पुरुष सहभागी असल्याचा आरोप आहे. जिल्हाधिकार्‍यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेशही दिले आहेत. दरम्यान अधिवेशनात या प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झालेली पहायला मिळाली. भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. दरम्यान, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यासंबंधी उच्चस्तरीय चार अधिकार्‍यांची समिती गठीत करण्यात आली आहे. दोन दिवसांत रिपोर्ट देण्यास सांगण्यात आले आहे. रिपोर्ट आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.

जळगाव वसतीगृहाती धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली असून याचे पडसाद आज विधानसभेत उडाले. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, हा इतका गंभीर विषय आहे, उद्या माझी बहीण, तुमची बहीण एवढं एक सेकंद नजरेत आणातुम्ही जर गृहमंत्री असता तर खून केला असता. अशा पद्धतीने तुमच्या, माझ्या आई बहिणीला नग्न करुन, कपडे काढून नाचायला लावलं जातंय आणि आम्ही नोंद घेवू म्हणतात. इथं मृत मनाचे आमदार आहेत? आमचं मन जिवंत आहे. तळपायाची आग मस्तकात गेली पाहिजे. उत्तरात सांगितले पाहिजे की, एक तासात चौकशी करतो. काय कारवाई करणार आहे याचा अहवाल घेतोपण म्हणतात नोंद घेतोहे पाप फेडावे लागेल. आमच्या आई-बहिणीला नग्न केले जाते या महाराष्ट्रात आणि आम्ही नोंद घेतो, अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त केला. यावर उत्तर देतांना अनिल देशमुख म्हणालेक की, जी घटना घडली त्याची संपूर्ण माहिती घेण्याचे काम सुरु आहे. व्हिडीओ तसेच इतर सर्व माहिती एकत्र केला जात असून जबाबही नोंदवले जात आहेत. याची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर कडक कारवाई करण्यात येईल, मात्र अनिल देशमुख यांच्या उत्तरानंतर सुधीर मुंनगंटीवार संतापले आणि १५ हजार खर्च करुनही पोलीस यंत्रणा माहितीच घेत नसेल तर हे सरकार कशासाठी आहे ? अशी विचारणा करत राष्ट्रपती राजवट लावावी लागेल असं म्हटलं. या सरकारवर राष्ट्रपती राजवट आणायची वेळ आली आहे असंही ते म्हणाले. मी संविधानाचा सन्मान करणारा व्यक्ती आहे. पण तुम्ही १०१ पापं केलीत, त्यामुळे आता राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही असंच वाटू लागलं आहे. कारण जर आमच्या आई-बहिणीची थट्टा होणार असेल तर राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग आहे, असा संताप मुनगंटीवारांनी व्यक्त केला.

संबंधित अधिकाऱ्याला कपडे काढून चोप द्यावा लागेल – मनसे

या प्रकरणावरुन मनसेने संबंधित पोलीस आणि अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.  मनसेच्या नेत्या रुपाली पाटील फेसबुकद्वारे म्हणाल्या की, जळगाव महिला वसतिगृहमध्ये पोलिसांसमोर महिलेला कपडे काढून नाचवत आहे. या प्रकरणाला संबंधित विभाग जबाबदार आहे. त्यामुळे सदर पोलीसाला आणि अधिकाऱ्याला त्वरीत निलंबित करा, अशी मागणी रुपाली पाटील यांनी केली आहे. अन्यथा आता आम्हाला त्या पोलिसाला आणि संबंधित अधिकाऱ्याला कपडे काढून मनसे चोप द्यावा लागेल, असा इशारा देखील रुपाली पाटील यांनी दिला आहे.

Copy