जळगाव रोड परीसरातील त्या 218 परीवारांना धान्य मिळण्यास सुरुवात

0

शिवसेना तालुका संघटक प्रा.धीधरज पाटील यांनी अन्न, नागरी पुरवठा मंत्र्यांकडे केली होती होती तक्रार

भुसावळ : जळगाव रोड परीरसरातील श्रीनगर, गणेश कॉलनी, जुना सातारा, भिरुड कॉलनी, कोळी वाडा, भोई नगर, हुडको कॉलनी परीसरातील 218 शिधापत्रिकाधारकांचा दुकान नंबर 12 च्या दुकानदाराने आवश्यक धान्य साठा नसल्याने पुरवठा बंद केला होता. गोरगरीबांना धान्य मिळण्यासाठी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी 5 एप्रिल 2020 रोजी महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन चंद्रकांत भुजबळ यांच्याकडे तक्रार केली होती. तहसीलदार दीपक धीवरे, पुरवठा अधिकारी तायडे, दुकानदार व प्रा.धिरज पाटील यांच्या सोबत बैठकीत समस्यांवर चर्चा झाली व तहसीलदारांनी योग्य उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर शनिवारी 65 ग्राहकांना धान्य वितरित करण्यात आले.

प्रशासनाकडून तक्रारीची दखल
प्रा.धीरज पाटील यांनी प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, तहसीलदार दीपक धीवरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्याकडे समस्या मांडल्या होत्या व चर्चा केली व प्रशासनाकडून तक्रारीची दखल घेण्यात आली.

सर्वसामान्यांना मिळाला दिलासा
संचारबंदीच्या काळात हाताला काम नसणार्‍या सामान्य नागरीकांना दिलासा मिळाला असून उद्यापासून उर्वरीत ग्राहकांना धान्य वितरण होईल यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार असून सदर दुकानदाराला सूचना दिल्या आहेत, असे प्रा.धीरज पाटील यांनी सांगितले.

दर्जेदार धान्य देण्याची मागणी
काही ग्राहकांनी मिळालेल्या धान्याच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केल असून दुकानदाराला असे धान्य न देण्याच्या सूचना करण्यात आल्या शिवाय सर्वच ग्राहकांना दर्जेदार धान्य मिळालेच पाहिजे यासाठी शासन स्तरावर बोलणी करून नागरीरकांच्या शंकांचे निरसन केले जाईल अशी माहिती प्रा.पाटील यांनी दिली. दरम्यान, पंकज इंगळे यांनी संचारबंदीचे उल्लंघण न होता प्रत्येक ग्राहकाला धान्य मिळेल असे नियोजन केले.