Private Advt

जळगाव येथील सैनिकी मुलां / मुलींचे वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

जळगाव –  माजी सैनिक /विधवांना कळविण्यात येते की, जळगाव सैनिकी मुलांचे वसतिगृह, मध्यवर्ती शिवाजी पुतळयाजवळील, जी. एस. मैदान, जळगाव येथे सदर वसतीगृहामध्ये एकूण ४८ मुलांची राहण्याची व्यवस्था आहे. तसेच सैनिकी मुलींचे वसतिगृह हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाजवळ, धुळे रोड, जळगाव येथे सदर वसतीगृहामध्ये एकूण ४८ मुलींची राहण्याची व्यवस्था आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात जे माजी सैनिक / विधवा जळगाव शहराच्या बाहेर राहतात व त्यांचे मुल जळगाव येथे उच्च शिक्षण घेत आहे.  त्याच्या मुलांना या वसतीगृहात प्रवेश दिला जातो. माजी सैनिकांच्या मुलांना अती अल्प दरात सैन्याच्या रँक प्रमाणे भोजनखर्च आकारले जाते व विधवांच्या पाल्यांना सदर वसतीगृहामध्ये विनामुल्य प्रवेश देण्यात येतो. प्रवेश जागा शिल्लक राहिल्यास इतर नागरिक पाल्यांना नियमानुसार प्रवेश दिला जाईल. प्रवेशासाठी प्रवेश पुस्तीका/ अर्ज वसतीगृह अधिक्षक/ अधिक्षीका व कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. तरी इच्छुक माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी वसतीगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी संबंधित अधिक्षक / अधिक्षीका यांचेकडून प्रवेश पुस्तीका/ अर्ज खरेदी करुन आपला अर्ज त्यांचेकडे सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. अधिक माहितीसाठी खालील नमुद दुरध्वनीवर किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा

श्री. चंद्रकांत पाटील अशासकीय वसतीगृह अधिक्षक मो.न. ९०६७३५४६५८ व दूरध्वनी क्र. ०२५७-२२३३०८८

श्रीमती अनिता पाटील वसतीगृह अधिक्षीका मो.न. ८७८८२४५२८२ किंवा दूरध्वनी क्र. ०२५७-२२४१४१४  या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.