जळगाव-भादली दरम्यान तिसर्‍या रेल्वेमार्ग चाचणी यशस्वी

0

भुसावळ : जळगाव-भादली दरम्यान ताशी 110 वेगाने डिझेल इंजिन चालवून दुसर्‍या टप्प्याची शनिवारी यशस्वी चाचणी झाली. यापूर्वीदेखील भुसावळ-भादली या 11 किमी अंतरात पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाली होती. त्यामुळे येत्या एप्रिल महिन्यापासून एकूण 24.13 किमी अंतराची तिसरी रेल्वे लाईन दळण-वळणासाठी वापरात येणार असल्याने वाहतूक समस्या सुटणार आहे शिवाय गाड्यांना आउटरला न थांबवता सरळ फलाटांवर येणार आहेत.

ताशी 110 च्या वेगाने चालवले डिझेल इंजिन
ताशी 110 च्या वेगाने डिझेल इंजिन चालवून जळगाव-भादली दरम्यान तिसर्‍या रेल्वे लाईनची चाचणी घेण्यात आली. रविवारी देखील ही चाचणी घेण्यात येईल. डीआरएम विवेककुमार गुप्ता, मुख्य अभियंता सुधीर पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य अभियंता पंकज धावरे, कार्यकारी अभियंता राहुल अग्रवाल, सेक्शन इंजिनिअर मोहीत कुमार, ब्रजेश कुमार यांच्यासह रेल्वेच्या अन्य अधिकार्‍यांनी ही चाचणी घेतली.