जळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी

0

जळगाव : राज्याच्या गृह विभागाने गुरुवारी रात्री पोलीस आयुक्त, उपायुक्त व पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या केल्या. त्यात जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांचीही बदली झाली असून त्यांच्या जागी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. पंजाबराव उगले यांची बदली झाली असली तरी त्यांना अद्याप पदस्थापना देण्यात आलेली नाही. मुंढे हे आयपीएस असून ते मूळचे बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत.