‘जळगाव पीपल्स बँके’च्या ग्राहकांना केंद्राच्या ‘लकी ड्रा’चे पारितोषिक

0

जळगाव : दि जळगाव पीपल्स को-ऑप बँक उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य मल्टिस्टेट शेडयुल्ड बँक आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या लकी ग्राहक योजना व डिजी-धन व्यापार योजनेंतर्गत कॅशलेस बँकिंग व्यवहार केल्याबद्दल जळगाव पीपल्स बँकेच्या ग्राहकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत आणि ना योजनेंतर्गत ग्राहकांच्या खात्यात हजार जमा झालेले आहेत. या ग्राहकांनी कॅशलेस बँकिंग व्यवहारांतर्गत बँकेच्या एटीएम डेबिट कार्ड व्दारे पेमेंट अदा केलेली आहेत. सदर ग्राहकांपैकी जळगाव येथील संगिता पाटील, विकास चौधरी, महेश सोनवणे, प्रकाश चौधरी, सुवर्णा शिंदे, प्रशांत बढे, ज्ञानेश्‍वर भोंडे, महेश महाजन व आयेशा शरीफ सनोबर यांचा बँकेतर्फे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, उप-जिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला.

यांनाही मिळाला लाभ
मुस्तफा बोहरी, सुहास राणे, महेंद्र पवार, योगेश पाटील, रणजित पोकळे- सिंहगड रोड, अनिल पाटील, बबन पायल, श्रीजिता सौविक, दिपाली मनिष राणे, वसिमोद्दीन जियाउद्दीन, रागिनी मोरेश्‍वर, सुरेश पाटील, मनिषा जोशी, निखिल राणे यांनाही या योजनेचा लाभ मिळाला आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी केले कौतुक
बँकेने वर्षभरात आतापर्यंत पिओएस मशिन व्यवहारांतर्गत 7 कोटी 92 लाख 91 हजार 209 रूपये इतक्या रकमेचा, इ-कॉम अंतर्गत 1 कोटी 68 लाख 47 हजार 430 रूपये इतक्या रकमेचे व्यवहार झालेले आहेत. जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आपल्या मनोगतात, सदर योजनेअंतर्गत जळगाव पीपल्स बँकेने सर्वप्रथम पुढाकार घेत या योजनेच्या लाभार्थी ग्राहकांना प्रमाणपत्र देवून सत्कार केला या बद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच महिलांनी स्वत: पुढाकार घेवून कॅशलेस व्यवहार करावेत, असे मार्गदर्शन करत बँकेस शुभेच्छा दिल्या.

21 ग्राहकांचा सत्कार
कॅशलेस व्यवहार करणारे जळगाव पिपल्स बँकेचे 21 ग्राहक केंद्र शासनाच्या ‘ लकी ग्राहक योजना व डिजी धन व्यापार योजना’ या लकी ड्रॉ योजनेअंतर्गत 1000 रुपयांचे बक्षिसाचे मानकरी ठरले आहेत. या ग्राहकांचा आज जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या हस्ते प्रमाण्पत्र देऊन गौरव करण्यात आला. या योजनेअंतर्गत 25 रोजी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये जळगाव पिपल्स बँकेच्या 21 ग्राहकांना प्रत्येकी एक हजार रुपये बक्षीस मिळाले, असून ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा झाली. या प्रसंगी बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, एमडी व सीइओ अनिल पाटकर आदी उपस्थित होते.