जळगाव तालुक्यातील तीन अर्ज अवैध

0

जळगाव । जिल्हा परिषद आणि पंचायत समितीनिवडणुकीसाठी नुकतेच उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत होती. गुरुवारी अर्ज छानणी असल्याने तहसिल कार्यालयात दिवसभर छानणी प्रक्रिया सुरु होती. दरम्यान छानणीच्या वेळी जळगाव तालुक्यातील तीन अर्ज विविध कारणाने अवैध ठरविण्यात आले आहे. यात चिंचाली गणातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे. या गणातील मंगला श्रावण ठाकुर आणि तडवी बेबाबाई यासीन या दोन्ही रा.कॉ.च्या उमेदवारांचे नामांकन अर्ज अपुर्ण असल्याने आणि जात वैधता प्रमाणपत्राची जुनी पोच पावती जोडल्याने अवैध ठरविण्यात आले आहे. दोन्ही उमेदवारांनी अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी उमेदवारी अर्ज सादर केले होते. तसेच बोरनार गणातील बेबी भागवत पवार या अपक्ष उमेदवारांचे अर्ज अनामत पावती न जोडल्यामुळे अवैध ठरविण्यात आले आहे.

एका अर्जावर दिवसभर नाट्यमय घडामोडी
चिंचोली गटातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडून अनुसुचित जमाती राखीव प्रवर्गासाठी उमेदवारी करणार्‍या रत्नाबाई शिवाजी बोरसे यांचा उमेदवारी अर्ज दिड वर्षापुर्वीची जुने जात वैधता प्रमाणपत्र पोच पावती सादर केल्याने अवैध ठरविण्यात आले होते. मात्र नंतर हाच उमेदवारी अर्ज नविन जात वैधता प्रमाणपत्र जोडण्याच्या हमीपत्र जोडल्याने मान्य करण्यात केला गेला. अगोदर अर्ज अवैध आणि नंतर वैध ठरविण्यात आल्याने जळगाव तहसिलकार्यालयात याप्रकरण दिवसभर नाट्यमय घडामोडी सुरु होत्या. हा अर्ज अवैध ठरवुन पुन्हा वैध ठरविण्यात आले असल्याने शिवसेनेने याविरुध्द हरकत घेतली आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यासंबंधीचे निवेदन शिवसेना तालुकाअध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी प्रांताधिकारी जलज शर्मा यांना दिले.