जळगाव तालुक्यातील कंडारीत दगडाने ठेचून तरुणाची हत्या

0

जळगाव : तालुक्यातील कंडारी येथे तुषार प्रभाकर सुर्वे (४१) या तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

नेरी-गाडेगाव रस्त्यावर गावाबाहेर तुषार यांचे शेत व खळे आहे. तुषार हा खळ्यात मयतावस्थेत पडलेल्या असल्याची माहिती प्रल्हादराव शिवाजी देशमुख यांनी कुटुंबाला कळविली. त्यानंतर प्रकार समोर आला. तुषार याच्या पश्चात पत्नी मनिषा, मुलगा ओम,वडील प्रभाकर भाऊराव सुर्वे, भाऊ हेमंत असा परिवार आहे.

अपर पोलिस अधीक्षकासह अधिकारी कर्मचार्‍यांकडुन चौकशी सुरु

घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक प्रवीण साळुंखे,सचिन कापडणीस, विजयसिंग पाटील, नरेंद्र वारुळे, दर्शन ढाकणे, प्रवीण ढाके, सतीश पाटील, राजू सोळंखे व किरण बाविस्कर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तुषार याची पत्नी मनिषा यांच्या फिर्यादीवरुन नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत वसंत धनगर याने रात्री साडे आठ वाजेपर्यंतच आपण मयत तुषार सोबत होतो, असे त्यांनी तपासात सांगितले आहे. ग्रामस्थाकडुन माहिती घेण्यासह जाब जबाब नोंदविण्याचे काम सुुुरु आहे

Copy