Private Advt

जळगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

भुसावळ/जळगाव : जळगाव तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. ही घटना मंगळवार, 8 फेब्रुवारी रोजी उघडकीला आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
तालुक्यातील एका गावात 17 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मंगळवार, 8 फेब्रुवारी रोजी रात्री 11 ते बुधवार 9 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजता या दरम्यान मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला. अल्पवयीन मुलीच्या पालकांनी तिचा नातेवाईकांसह मैत्रिणींकडे शोधाशोध केली परंतु ती कुठेही आढळून आली नाही. याप्रकरणी सायंकाळी 6 वाजता अल्पवयीन मुलीचे वडीलांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.