जळगाव जिल्ह्यात 4 हजार 889 रुग्णांचे स्क्रिनिंग

0

जळगाव – जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज 24 एप्रिल, 2020 रोजी एकूण 156 नवीन रुग्णांचे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी स्क्रीनिंग करण्यात आले. त्यापैकी 128 रुग्णांना कोणतीही कोरोना सदृष्य लक्षणे नसल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यापैकी 12 रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले तर 28 रुग्णांना ॲडमिट करण्यात आले आहे. तसेच 26 रुग्णांचे घशातील स्त्रावाचे नमुने (स्वॅब) घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत 105 रुग्णांचे तपासणी अहवाल अद्याप अप्राप्त आहेत.

जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत 420 संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी 302 रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून दोन रुग्णांचे अहवाल रद्द करण्यात आले आहे. जिल्ह्यात आज पाच कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या अकरा झाली आहे. त्यापैकी एक रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे. तर 3 रुग्णांचा मृत्यु झाला असून उर्वरित कोविड रुग्णालयात उपचार घेत आहे. आज आढळून आलेले कोरोना बाधित रुग्ण हे एकाच कुटूंबातील असून या कुटूंबातील 52 वर्षीय महिला यापर्वूीच कोरोना बाधित आढळून आली असून तीचा मृत्यु झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत 4 हजार 889 रुग्णांचे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी स्क्रिनिंग करण्यात आले आहे. त्यापैकी 4469 रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाही. यापैकी आतापर्यंत 259 रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.

Copy