जिल्ह्यात कोरोनाबाधींतांचा आकडा 52 : आणखी 7 अहवाल पॉझिटीव्ह

0

जळगाव: येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या 76 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 68 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले, एका व्यक्तीचा अहवाल रिजेक्ट करण्यात आला आहेत. तर सात व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

या सात व्यक्तीमध्ये एक 40 वर्षीय पुरूष हा अजिंठा चौफुली, जळगाव येथील, एक 65 वर्षीय पुरूष हा अडावद, ता. चोपडा, दोन व्यक्ती मध्ये 24 वर्षीय महिला व 30 वर्षीय पुरूष हे पाचोरा येथील तर अमळनेर येथील तीन व्यक्तीमध्ये 13 व 23 वर्षाचे तरूण व 16 वर्षीय तरूणीचा समावेश आहे. यापैकी जळगाव येथील तरूणाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 52 इतकी झाली आहे. त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे.

Copy