जळगाव जिल्ह्यात आणखी एक कोरोना बाधित रूग्ण आढळला

0

नुकत्याच प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील संशयित रुग्णांपैकी 12 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 11 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

तर एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली आहे. कोरोना बाधित व्यक्ती भुसावळ येथील 38 वर्षीय महिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 32 झाली आहे. निगेटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या 11 व्यक्तींपैकी 7 व्यक्ती या भुसावळच्या असून 4 व्यक्ती या जळगावच्या आहेत. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे.