जळगाव जिल्ह्यात आणखी एक कोरोना बाधित रूग्ण आढळला

0

जळगाव: येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या 38 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 37 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. तर एक व्यक्तीचा तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

पाॅझिटिव्ह आढळलेला 50 वर्षीय पुरूष हा यापूर्वी पाॅझिटिव्ह आढळलेल्या समतानगर, जळगाव (मुळगाव चिंचोली, ता. बाळापूर, जि. अकोला) येथील महिलेचे वडील आहेत.

निगेटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये शेंदूर्णी येथील अकरा व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 53 इतकी झाली आहे. त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे

Copy