जळगाव जिल्ह्यात आज आणखी 29 कोरोना बाधित रुग्ण आढळले

0

जळगाव – भडगाव, नशीराबाद, चोपडा, सावदा, भुसावळ, जळगाव येथील 149 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त. 120 अहवाल निगेटिव्ह आले आहे तर 29 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भडगावचे चार, चोपडा, सावदा, भुसावळ, उमाळा, विटनेर येथील प्रत्येकी एक तर जळगाव शहरातील जखनीनगर, तांबापुरा, सलगार नगर व इतर भागातील वीस व्यक्तींचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 557 झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.