जळगाव जिल्ह्यात आज आणखी सव्वीस कोरोना बाधित रूग्ण आढळले; एकूण ४१४

5

जळगाव: जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, वरणगाव, धरणगाव पारोळा येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 114 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी 88 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर *सव्वीस* व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसवाळ येथील 21, वरणगावचे 3, चाळीसगाव व पारोळा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 414 इतकी झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Copy