Private Advt

जळगाव जिल्ह्यातील चार सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

निंभोर्‍यासाठी गणेश धुमाळ तर मेहुणबारेसाठी विष्णू आव्हाड यांची नियुक्ती

भुसावळ : जिल्ह्यातील सात सहाय्यक निरीक्षकांची पोलिस निरीक्षक पदावर नुकतीच पदोन्नती झाल्यानंतर संबंधित अधिकारी बदली ठिकाणी रूजू झाले होते तर त्यातील चार पोलिस ठाण्यांमध्ये प्रभारी अधिकार्‍यांचे पद रीक्त झाल्याने या रीक्त पदांवर चौघा अधिकार्‍यांची नेमणूक पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी मंगळवार, 8 रोजी काढलेल्या आदेशान्वये केली आहे.

निंभोरा पोलिस ठाण्यात गणेश धुमाळ यांची नियुक्ती
भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गणेश धुमाळ यांची निंभोरा पोलिस ठाण्यात तर एरंडोलचे सहाय्यक निरीक्षक तुषार मुरलीधर देवरे यांची चाळीसगाव शहर वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे तसेच चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे विष्णू बबन आव्हाड यांची मेहुणबारे पोलिस ठाण्यात तर जिल्हापेठचे महेंद्र अशोक वाघमारे यांची पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात सहाय्यक निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.