Private Advt

जळगाव जिल्ह्यातील चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

भुसावळ : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी प्रशासकीय कारणास्तव जळगाव जिल्ह्यातील चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात दोन बदल्या विनंतीवरून तर दोन बदल्या प्रशासकीय कारणावरून करण्यात आल्या आहेत.

या निरीक्षकांच्या बदल्या
पारोळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष नारायण भंडारे यांची जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे तर जळगाव जिल्हापेठचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांची पारोळा पोलिस निरीक्षकपदी बदली करण्यात आली. जळगाव नियंत्रण कक्षातील राहुल सोमनाथ खताळ यांची धरणगाव पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे तर धरणगावचे शंकर विठ्ठल शेळके यांची मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.