जळगाव जिल्ह्याचा कौल कुणाला ? मतमोजणी सुरू !

0

जळगाव । जनशक्ति चमूकडून ।
नुकतीच राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दोन टप्पात निवडणुक प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात म्हणजेच गुरुवारी १६ फेबु्रवारी रोजी घेण्यात आले होते. याच्या मतमोजणीस प्रारंभ झाला आहे.

आज गुरुवारी २३ रोजी सकाळी १० वाजेपासुन मतमोजणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील ७५४ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ६७ गटासाठी आणि पंचायत समितीच्या १३४ गणासाठी गुरुवारी १६ रोजी मतदान घेण्यात आले. जिल्हा परिषदेच्या ६७ गणासाठी एकुण २३४ उमेदवार रिंगणात होेते. तर पंचायत समिती गणासाठी ५२० उमेदवार रिंगणात होते. संपुर्ण जिल्ह्यात सरासरी ६२.५९ टक्के मतदान झाले होते.

येथे सुरू झाली मतमोजणी
जळगाव-नुतन मराठा कॉलेज, भुसावळ- शासकीय गोदाम, यावल-हतनुर गोदाम ,बोदवड-तहसिल कार्यालय आवार, मुक्ताईनगर-तहसिल कार्यालय परिसर, रावेर-तहसिल कार्यालय परिसर, पाचोरा-सिंधी समाज मंगलकार्यालय, चोपड-बाजार समिती, अमळनेर-स्टेशन रोड इंदिरा भवन, पारोळा-नविन प्रशासकीय इमारत आवार, धरणगाव-तहसिल कार्यालय परिसर, भडगाव- उपबाजार समिती सभागृह, एरंडोल-आयटीआय कॉलेज परिसर, चाळीसगाव-हिरापूर रोड चव्हाण कॉलेज, जामनेर- बाजार समिती आदी ठिकाणी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे.