Private Advt

जळगाव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला – संजय राउत

जळगाव – मुंबई कोकणा नंतर जळगाव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असे विधान राज्यसभा खासदार तथा शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राउत यांनी आज शिवसेना बैठकीत केले. पक्ष बांधणीच्या संदर्भात ते उत्तर महाराष्ट्राचा दौरात आहेत. यावेळी त्यांनी जळगावात बैठक घेतली. याच बरोबर येत्या काळात आम्ही जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार निवडून आणू असेही म्हणले याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, विलास पारकर, जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ व प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोरआप्पा पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, महापौर सौ. जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.