Private Advt

जळगाव जिल्हा बँकेला ईडीची नोटीस?

खासगी कारखान्याच्या कर्जप्रकरणाची माहिती मागविली

जळगाव –जिल्ह्यातील एका खासगी साखर कारखान्याला कर्जपुरवठासह बँकेतील इतर आर्थिक व्यवहारासंबंधात सक्त वसूली संचालनालय अर्थात ईडी विभागाने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस बजावली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भात जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा नोटीससंदर्भात अद्याप माहिती नसल्याचे सांगितले. दरम्यान जिल्हा बँकेला ही नोटीस प्राप्त झाल्याच्या माहितीने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.