जळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड

0

महिलांना व्यवहार कळत नाही असे म्हटले जाते. पण जिच्या हाती संसाराची दोरी तिच्याच हाती आता तिजोरीही आली आहे. अलिकडच्या काळात संसाराचा गाडा यशस्वीपणे हाकणार्या महिला तिजोरीचीही उत्तम देखभाल करू लागल्या आहेत. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर. सन 2015 मध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची सुत्रे अ‍ॅड. रोहिणी खडसे यांनी स्विकारली. आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हा बँकेची गाडी रूळावर आणण्यासाठी आर्थिक शिस्त लावणे गरजेचे होते. अध्यक्षा अ‍ॅड. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे यांनी हीच बाब लक्षात घेत व्यवस्थापकीय खर्चात कपात करून आर्थिक शिस्तीची सवयच लावली. संचालक मंडळात जिल्ह्यातील विविध पक्षांचे मातब्बर नेते असतांनाही अ‍ॅड. रोहिणी खडसे यांनी त्यांच्यातील युवा नेतृत्वाची चुणूक दाखविली. जळगाव जिल्हा बँकेच्या इतिहासात महिला म्हणून सलग पाच वर्ष कार्यकाळ पुर्ण करणार्या अ‍ॅड. रोहिणी खडसे ह्या एकमेव आहेत. आशिया खंडात दबदबा राहिलेल्या जिल्हा बँकेची वाटचाल खर्या अर्थाने सुवर्णपादाने सुरू आहे.

शंभर वर्षात प्रथमच स्वभांडवालतून कर्ज पुरवठा

दिनांक 31 मार्च 2015 रोजी असलेल्या ठेवीमध्ये रु.1200 कोटीने वाढ झाली आहे. तर भाग भांडवलात रु.23.78 कोटीने वाढ झाली असुन 31 मार्च 2020 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेस ढोबळ नफा रु.64 कोटी 87 लाख झालेला आहे. बँकेने संपूर्ण आर्थिक वर्षात रिझर्व बँक नाबार्डने निर्धारीत केलेल्या प्रमाणापेक्षा रोखता व तरलता जास्त राखलेली आहे. रिझर्व बँकेच्या निकषानुसार सीआरएआरचे प्रमाण 9 टक्के राखणे बंधनकारक असतांना बँकेने सीआरओआर 11.88 टक्के राखून रिझर्व बँकेच्या निकषापेक्षा जास्त प्रमाण राखलेले आहे. बँकेच्या कर्जा व्यतिरिक्त एकूण गुंतवणुकीत रु.974 कोटीने वाढ करुन बँकेची एकूण गुंतवणुक रु.2009 कोटी आहे. बँकेच्या सर्व शाखा संगणकीकृत करुन सीबीएस प्रणालीवर सध्या बँक कामकाज करीत आहे. बँकेने गत 3 वर्षापासून बाहेरील कर्जाची उचल केलेली नसून गेल्या 100 वर्षात प्रथमच बँकेने केलेला संपूर्ण कर्ज पुरवठा स्व: भांडवलातून केलेला आहे. बँकेने एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस व एसएमएस सुविधा बँकेच्या ग्राहकांसाठी सुरु केलेली आहे. बँकेने इ टेंडरींगव्दारे खरेदी विक्री सुरु केलेली आहे. नाबार्डच्या मदतीने प्रत्येक तालुक्यासाठी आर्थिक साक्षरता केंद्र सुरु केलेले आहेत.

जिल्हा बँक शाखांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था

मुख्य कचेरीसह 56 शाखांमध्ये सीसीटीव्ही व अलार्म सिस्टीम सुरु केलेली आहे. बँकेची महत्वाची कागदपत्रे सुरक्षित राहाण्याचे दृष्टीने डिजीटीलायझेशन केलेले आहे. बँकेच्या व्यवसायामध्ये रु.1200 कोटीची भरीव वाढ झालेली आहे. बेलगंगा सहकारी साखर कारखाना ऑन लाईन पध्दतीने यशस्वीरित्या विक्री केलेला आहे. कर्मचारी वर्ग कमी असतांना देखील ग्राहकांना चांगली सेवा देत आहोत. बँकेच्या चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळाने काटकसरीचे धोरण अवलंबून बँकेचा सरासरी व्यवस्थापन खर्च गेल्या 100 वर्षात प्रथमच 1.72 टक्के झालेला आहे. दिलेल्या कर्जात रु.521 कोटीने वाढ बँकेने उत्पन्न वाढविणेसाठी व शेतकर्यांना नविन तंत्रज्ञानासाठी कर्ज पुरवठा होण्याच्या दृष्टीने पॉली हाऊस, नेटशेड, सौरउर्जा पंप, शेती कुंपण कर्ज व गटशेती इत्यादि कारणांसाठी कर्ज धोरण राबविलेले आहे. रुपे डेबीट कार्ड, व रुपे किसान क्रेडीट कार्ड धारकांना नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया व न्यु.इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत एटीएम कार्ड धारकांना रु.1लाख वैयक्तिक अपघात विमा लागू केलेला आहे. नाबार्डकडून बँकेस एफ.आय.एफ. अंतर्गत संगणकीकरण करणेसाठी रु.488 लाख, एटीएम अ‍ॅडऑनसाठी रु.43 लाख 92 हजार, पीएफएमएससाठी रु.2 लाख 75 हजार, सी केवायसी साठी रु.2 लाख 94 हजार तसेच रुपे केसीसी कार्डसाठी रु.25 लाख बँकेस अनुदान मिळालेले आहे. बँकेने नुकतीच सी केवायसी सुविधा खातेदारांना उपलब्ध करुन दिलेली आहे.

विधानसभेत जिल्हा बँकेचा गौरव

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तत्कालीन युती सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा सर्वाधिक लाभ मिळवुन दिल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाषण करतांना जळगाव जिल्हा बँकेचा गौरव केला होता. राज्यात कर्जमाफीचा लाभ देण्यात जळगाव जिल्हा बँक अव्वल ठरली होती.

डेबीट कार्ड वाटपाबाबत पुरस्कार
महाराष्ट्र व गुजराथ राज्यामध्ये जिल्हा बँकेमार्फत एटीएम कार्डव्दारे सर्वात जास्त व्यवहार करणारी बँक म्हणून आपल्या बँकेस एनपीसीआयकडून आलेल्या रिपोर्टनुसार सर्वत्र टेक्नॉलॉजी या कंपनीकडून गौरवण्यात आलेले आहे. तसेच बँकेस भारतामध्ये या बाबतीत 50 वा क्रमांक मिळालेला असून महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. बँकींग फ्रंटीअर्स मार्फत बँकेस सर्वोत्कृष्ठ डेबीट कार्ड वाटप संदर्भात एफसीबीए 2018 अंतर्गत पुरस्कार मिळालेला आहे. विविध शासकीय अनुदान नुकसान भरपाई तसेच इतर रकमा लाभार्थ्यांच्या खात्यात थेट वर्ग होणे करिता भारत सरकारच्या पीएफएमएस सिस्टीमवर बँक संलग्नित झालेली आहे. त्यामुळे आता बँकेच्या सर्व खाते धारकांना विविध शासकीय अनुदान रकमा थेट त्यांच्या खात्यात जमा होऊन मिळत आहे. खाते धारकांकरिता कर्ज मंजूरी प्रक्रिया सुलभ होण्यासाठी त्यांचा सिबील स्कोअर उपलब्ध होणेची सुविधा देखील बँकेने सुरु केलेली आहे.
राज्याच्या सहकार क्षेत्रात जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वाटचाल अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे सुरू आहे. गेल्या पाच वर्षात जिल्हा बँकेने खर्या अर्थाने सुवर्णकाळ अनुभवला आहे.

जितेंद्र देशमुख, कार्यकारी संचालक, जिल्हा बॅंक जळगाव

Copy