Private Advt

जळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील

पदभार स्वीकारला : लाचखोरांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन

जळगाव : जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत श्रीराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच शुक्रवारी पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी पोलीस निरीक्षक निलेश लोधी यांनी त्यांचे स्वागत केले. जळगाव एसीबीचा प्रभारी पदभार पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्याकडे सोपवण्यात आला होता त्यांच्याकडे नाशिकचाही पदभार असल्याने जळगाव पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

लाचखोरांविरोधात तक्रारी करण्याचे आवाहन
जळगाव जिल्ह्यातील नागरीकांकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उप अधीक्षक, श्री.शशीकांत पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अँन्टी करप्शन ब्युरो कार्यालय, जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे * दुरध्वनी क्रं. 0257-2235477 वा मोबाईल 8766412529 तसेच * टोल फ्रि क्रमांक 1064 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.