जळगावाहून चोरलेली दुचाकी भुसावळात पोलिसांना गस्तीदरम्यान आढळली

0

भुसावळ- बाजारपेठ पोलिसांना गस्ती दरम्यान वांजोळा रोडवर बेवारस दुचाकी आढळली. पोलिसांनी वाहनाच्या चेसीस क्रमांकावरून माहिती काढल्यानंतर ही दुचाकी जळगावातून पाच महिन्यांपूर्वीच चोरीला गेल्याचे उघडकीस आले. बाजारपेठचे पोलिस निरीक्षक देविदास पवार मार्गदर्शनाखाली हवालदार जोशी, विकास सातदिवे, कॉन्स्टेबल सचिन चौधरी हे गस्तीवर असताना 20 हजार रुपये किंमतीची व हिरो होंडा कंपनीची काळया रंगाची फॅशन प्रो दुचाकी रस्त्याच्या कडेला लावलेली आढळली. या दुचाकीचा इंजिन नंबर व चेचीस नंबरवरून माहिती काढल्यानंतर ही दुचाकी जळगावातील रहिवासी विजय दत्तात्रय पाटील यांच्या मालकिचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी याबाबत जळगाव शहर पोलिस ठाण्यात 17 रोजी दुचाकी चोरीला गेल्याबाबत गुन्हा दाखल केला होता. बाजारपेठ पोलिसांनी ही दुचाकी जळगाव शहर पोलिस ठाण्याच नाईक दीपक पाटील यांच्या ताब्यात दिली.