Private Advt

जळगावात 50 वर्षीय महिलेच्या गळ्यातून धूम स्टाईल पोत लांबवली

जळगाव : शहरात धूम स्टाईल मोबाईल लांबवण्याचे प्रकार सुरू असतानाच आता धूम स्टाईल महिलेच्या गळ्यातून पोत लांबवण्यात आल्याने महिलावर्गात भीती पसरली आहे. शुक्रवार, 11 मार्च रोजी रात्री आठ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

शतपावली करताना लांबवली पोत
शहरातील मोहन नगरातील रहिवासी वैशाली प्रकाश पाचपांडे (50) या महाबळ येथून मोहाडी रोडकडे शतपावली करीत असतांना अज्ञात चोरटे दुचाकीवरून आले व काही कळण्याआत त्यांनी महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपये किंमतीची व दोन तोळ्याची सोन्याची मंगलपोत लंपास केली. ही घटना शुक्रवार, 11 मार्च रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.

पोलिस अधिकार्‍यांची धाव
घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी भेट दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या आधारावर चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.