Private Advt

जळगावात 28 वर्षीय तरुणाचा चाकूचे सपासप वार करीत खून

जळगाव : शहरातील समता नगर भागातील रहिवासी असणार्‍या 28 वर्षीय तरुणावर चाकूहल्ला करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. जळगावात झालेल्या खुनानंतर मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीचा कसून शोध सुरू केला आहे. सागर नरेंद्र पवार (28, समता नगर, जळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

खुनाचे नेमके कारण अस्पष्ट
शहरातील समता नगर भागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सागर नरेंद्र पवार (28) हा तरुण एकटाच वास्तव्यास होता. शुक्रवारी रात्री उशीरा त्याच्यावर एकाने चाकूहल्ला केल्याने यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या किंचाळ्या ऐकून परीसरातील नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात हलविले. येथे उपचार सुरू असतांना शनिवारी सकाळी पाच वाजता त्याने शेवटचा श्वास घेतला.

तरुणाच्या हत्येने खळबळ
सागर नरेंद्र पवार हा तरुण समता नगरात एकटाच राहत होता. कुणाच्या अध्यात-मध्यात नसणार्या या तरूणाच्या हत्येमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे फिरवत आरोपींचा शोध सुरू केला आहे.