Private Advt

जळगावात हॉटेलातून मोबाईल लांबवला : चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगाव : अजिंठा चौफुली पक्षहसरातील हॉटेलातून मोबाइल लांबवणार्‍या संशयिताच्या स्थानिक गुन्हे शाखेने बुधवार्रें 9 फेब्रुवारी रोजी मुसक्या आवळल्या आहेत. गोविंदा आधार पवार (31, रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव असून त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला.

मोबाईल चोरी प्रकरणी दाखल होता गुन्हा
अजिंठा चौफुली परीसरातील ईदगाह कॉम्प्लेक्समध्ये जमजम नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलातील मॅनेजर शाहरुख सिकंदर खान (28, रा.नशिराबाद) यांचा काऊंटरवर ठेवलेला मोबाईल चोरट्यांनी लांबवल्याची घटना 14 जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. मोबाईल चोरटा रामेश्वर कॉलनीतील असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार पोलिस हेड कॉन्स्टेबल विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, सुधाकर अंभोरे, संदीप सावळे नितीन बाविस्कर, राहूल पाटील, प्रीतम पाटील, ईश्वर पाटील यांच्या पथकाने बुधवारी रामेश्वर कॉलनीतून संशयीत गोविंदा पवार याला अटक करीत मोबाईल जप्त केला.