जळगावात शहरातील हमालावर कारण नसताना चाकूहल्ला

In Jalgaon, a knife attack was carried out without any reason on the attack in the city जळगाव : शहरातील शिवाजीनगर भागातील क्षत्रिय मंगल कार्यालयासमोर हमाल काम करणार्‍या तरुणावर कारण नसताना एकाने चाकूने मारहाण करत गंभीर दुखापत केली. मारहाण करणार्‍याविरुद्ध जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

कारण नसता केली मारहाण
शिवाजीनगर हुडको परीसरात आनंद तुकाराम जमदाळे (24) हा तरुण वास्तव्यास असून 30 सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी आनंद जमदाळे हा शिवाजीनगर भागातील क्षत्रिय मंगल कार्यालयासमोर उभा असताना बबल्या हिरालाल जोहरे उर्फ बबल्या चॉपर हा त्या ठिकाणी आला त्याने काही कारण नसताना आनंद जमदाळे या उजव्या बाजूला कमरेवर चाकूने मारहाण करून दुखापत केली. तसेच अश्लील शिवीगाळ करत लाथांनी मारहाण केली. या प्रकरणी आनंद जमदाडे यांनी सोमवारी तक्रार दिल्यानंतर बबल्या हिरालाल जोहरे उर्फ बबल्या चॉपर (शिवाजीनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय झाल्टे करीत आहेत.