जळगावात विद्यार्थ्याच्या हातातील मोबाईल धूम स्टाईल लांबवला

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर आयएमआर महाविद्यालयाजवळ 19 वर्षीय विद्यार्थी कानाला मोबाईल लावून बोलत असताना अज्ञात दोन भामट्यांनी मागून दुचाकीवर येवून मोबाईल लांबविल्याची घटना मंगळवार, 30 नोव्हेंबर रोजी रात्री घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

धूम स्टाईल लांबवला मोबाईल
हर्षल जितेंद्र पाटील (19, रा.विद्यासागर, शिंदखेडा, जि.धुळे, ह.मु. शिव कॉलनी जळगाव) हा विद्यार्थी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आयएमआर महाविद्यालयात बीसीएचे शिक्षण घेतो. मंगळवार, 30 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास आयएमआर महाविद्यालयासमोरून मोबाईलवर बोलत पायी जात होता. त्याचवेळी विद्यार्थ्याच्या मागून दोन अज्ञात चोरटे दुचाकीवर अराले व त्यांनी हातातील 15 हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून दुचाकीने पळ काढला. याप्रकरणी विद्यार्थ्याने जिल्हापेठ पोलिसात धाव घेवून तक्रार दिली. विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा.महेंद्र वाघमारे करीत आहे.