Private Advt

जळगावात महिलेवर चाकूहल्ला : चौघांविरोधात गुन्हा

जळगाव : तरुणासोबत लिव्ह इन रीलेशीपमध्ये राहत असलेली 30 वर्षीय महिला तरुणाला सोडून तिच्या आईकडे निघून गेल्याच्या रागातून तरुणाने महिलेवर चाकूने वार केल्याची गंभीर घटना जळगाव शहरातील आशाबाबा नगरात घडली. या प्रकरणी गुरुवार, 19 मे रोजी गुन्हा दाखल होवून रामानंदनगर पोलिसांनी चौघांना अटक केली.

तरुणाला सोडून महिला आईकडे गेल्याने चाकूहल्ला
जळगाव शहरातील गेंदालाल मिल भागातील 30 वर्षीय महिला रामानंदनगर परीसरातील बंटी उर्फ प्रदुम्न नंदू महाले यांच्यासोबत लिव्ह इन रीलेशनशीपमध्ये राहत होती. महिला बंटी यास सोडून तिच्या आईकडे राहायला गेल्याच्या रागातून बंटी याने 18 मे रोजी आशाबाबनगर येथे महिलेच्या हातावर व डोक्यावर चाकूने वार केले तसेच चाकूने दहशत निर्माण केली तर बंटी सोबतच्या इतर तिघांनी तक्रार करु नये म्हणून महिलेला रीक्षातून पळवून नेले. महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन गुरुवार, 19 मे रोजी बंटी ऊर्फ प्रदुन्म नंदू महाले (रा.रामानंदनगर), अरबाज अमजद खान पठाण (रा.आझाद नगर), गुलशन रजा (रा.चिश्तीया मशीदजवळ ), समाधान हरचंद भाई (रा. खंडेराव नगर) व सोनू ऊर्फ समीर शेख लुकमान शेख (रा.पिंप्राळा हुडको) या चार जणांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. चारही संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहेत.