जळगावात मराठी चित्रपटाच्या ऑडिशन

0

जळगाव । तनिष्क डिजीटल आय या पुण्याच्या चित्रपटाने र्मिती संस्थेच्यावतीने पत्रकार भवन जळगाव येथे 5 मार्च 2017 रोजी सकाळी 10 ते 6 या वेळात खान्देशी कलाकारांसाठी ऑडीशनचे आयोजन करण्यात आले आहे. तनिष्क एक नामांकित संस्था असून या संस्थेने ‘पिपाणी’ आणि ‘विधाता’ यासारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करुन आपली. प्रतिभा सिध्द केली आहे. यावेळीही संस्थेच्यावतीने एका मराठी चित्रपटाची वेगळेपण म्हणजे या चित्रपटातून खान्देशी संस्कृती, भाषा, यांचे दर्शन या चित्रपटात घडणार आहे.

चित्रपट पुर्णपणे खान्देशी भागातील कथेवर चित्रीत आहे. याचे पूर्ण शुटींग देखील खान्देशातच होणार आहे. या चित्रपटामधून खान्देशमधील जनजीवन, आदीवासी संस्कृती प्रथमतःच चित्रपटामधून पुढे येणार आहे.

निवड झालेल्या चित्रपटात काम करता येणार
आपल्या भागात होणार्‍या या चित्रपटामध्ये आपल्या स्थानिक कलावंतांना चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळावी, आपल्या कलावंतांना चित्रपट माध्यमात प्रवेश मिळावा. यासाठी ‘परिवर्तन’ जळगाव या संस्थेने पुढाकार घेतला आहे. तनिष्क या संस्थेसोबत स्थानिक कलावंत निवड आयोजनात परिवर्तन ने सातत्याने पुढाकार घेतला आहे. कार्यकारी निर्माता रुनाली पाटील यांनी ही माहिती दिली. जळगावमध्ये परिवर्तनने सातत्याने कलावंत घडविण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. सदर कलावंत निवडीचे काम तनिष्क करीत आहे. या चित्रपट निर्मितीमध्ये परिवर्तनचे शंभु पाटील, पुरुषोत्तम चौधरी, मंजुषा भिडे, हर्षल पाटील, नारायण बाविस्कर, मोना तडवी हे सहाय्य करीत आहेत. या चित्रपटासाठी सर्व वयोगटातील कलावंतांची गरज आहे. महाराष्ट्रामधील नामांकीत प्रोडक्शन हाऊसचा हा चित्रपट असल्याने अधिकाधिक कलावंतांनी या ऑडीशनला उपस्थित रहावे, बाबूराव भोर यांनी केले आहे.