Private Advt

जळगावात मद्यधूंद पतीची पत्नीला बेदम मारहाण

जळगाव : शहरातील राजीव गांधी नगरातील 40 वर्षीय विवाहितेला दारुच्या नशेत पतीने बेदम मारहाण केली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मद्यधूंद पतीविरोधात गुन्हा
संगीता रमेश झेंडे (40) या राजीव गांधी नगरात कुटूंबीयांसह वास्तव्यास असून त्यांचे पती रमेश बाबासाहेब झेंडे हे शुक्रवारी संध्याकाळी दारुच्या नशेत घरी आले. काहीएक कारण नसतांना वाद घालून पत्न संगीताला लोखंडी पट्टीने हल्ला चढवून खांद्यावर, डाव्या बरगडीवर, मनगटावर मारहाण केल्याने पत्नी जखमी झाल्या. य प्रकरणी त्यांनी रामानंद नगर पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक चंद्रकांत पाटील करीत आहेत.