Private Advt

जळगावात मटका घेताना संशयीत पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : जळगाव-पहुर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ मटका खेळ खेळणार्‍या संशयीताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. संशयीताच्या ताब्यातून 730 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश मुरलीधर महाजन (आनंद नगर, जामनेर, ह.मु.शिव कॉलनी, जळगाव) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव ते पहुररोड वरील इंडियन पेट्रोल पंपाजवळ गणेश मुरलीधर महाजन मिलन मटका खेळ खेळवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निलेश गोसावी, पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, पोलिस नाईक दत्तात्रय बडगुजर यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी 6.30 वाजता संशयीताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून जुगाराच्या साहित्यासह 730 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याबाबत पोलिस नाईक दत्तात्रय बडगुजर यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.