Private Advt

जळगावात भर दिवसा चोरट्यांनी सव्वा दोन लाखांची रोकड लांबवली

भुसावळ/जळगाव : शहरातील दत्त नगरातील दत्त मंदिराजवळील एका घरातून भरदिवसा दोन लाख 26 हजारांची रोकड लांबवली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

भर दिवसा लांबवली रोकड
शाहरुख खान अक्तरखान (27, रा.मास्टर कॉलनी, दत्त नगर, दत्त मंदिराजवळ जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 16 मार्च 2022 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास शाहरुख व त्यांची पत्नी असे कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर चोरट्याने उघड्या असलेल्या घरातील लाकडी कपाटातून प्लॅस्टीक पिशवीतील तीन लाख 26 हजारांची रक्कम लांबवली. या प्रकरणी शाहुरूख खान अक्तरखान यांनी गुरूवारी रात्री एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत.