Private Advt

जळगावात बंद घर फोडून 30 हजारांच्या दागिण्यांवर डल्ला

जळगाव : बंद घराला टार्गेट करीत दोघांनी 30 हजारांचे दागिने लांबवल्याचा प्रकार पिंप्राळा रोडवरील भोईटे नगरात घडला. या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा
संजयसिंह मदनसिंह राजपूत (52, रा.भोईटे नगर, पिंप्राळा रोड, जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. 23 फेब्रुवारी रोजी ते कामाच्या निमित्ताने घर बंद करून गेले होते. दरम्यान घराच्या मागे राहणार्‍या अशोक घोरपडे व त्याचा मुलगा विकी उर्फ हेमंत अशोक घोरपडे (दोन्ही रा.भोईटे नगर, पिंप्राळा रोड, जळगाव) यांनी घराच्या किचनला असलेल्या ग्रीलची खिडकी तोडून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले चांदीचे दागिने मिळून एकूण 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लांबवले. संजयसिंग राजपूत हे मंगळवार, 15 मार्च रोजी घरी आल्यावर हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी त्यांनी बुधवार 16 मार्च रोजी जळगाव शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अशोक घोरपडे व त्यांचा मुलगा विकी उर्फ हेमंत घोरपडे (दोन्ही रा.भोईटे नगर पिंप्राळा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल उमेश भांडारकर करीत आहे.